आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून करंजी येथे रुद्रपुजेचे आयोजन

करंजी8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील ग्रामदैवत उत्तरेश्वर मंदिरामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून श्रावणमास रुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी गौरंगजी यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील अनेक महिला पुरुषांनी संकल्प करून या रुद्रपूजेत सहभाग घेतला.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जिल्हाभरात ३० ते ३५ ठिकाणी रुद्रपूजेचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचीन काळापासून रुद्रपूजा चालत आलेली आहे. या पूजेद्वारे आपल्याला आंतरिक शांती मिळते, अनेक वेदशास्त्र वचनात रुद्र पूजेचा उल्लेख दुष्ट शक्तींच्या नायनाटासाठी केला आहे.

इच्छापूर्तीसाठी रुद्र पूजा एक प्रभावी पूजा मानली जाते. या रुद्रपूजे प्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वाती शेटे, संगीता पाचे, सुनिता धाडगे, राजेंद्र पाचे, संतोष अकोलकर, सुनिल साखरे, राजेंद्र अकोलकर, अनिल भाकरे, विनायक अकोलकर, जालिंदर अकोलकर, उत्तम अकोलकर, सतीश मुनोत, झुंबर शिरसागर, संभाजी अकोलकर, डॉ. विलास नवगजे,पोपट गोरे यांच्यासह गावातील महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...