आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:कलेच्या माध्यमातून आपले संस्कार जोपासले जातात, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्याची पारंपरिक संस्कृती, कला जोपासण्यासाठी कलावंतांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे गरजेचे आहे. कलेच्या माध्यमातून आपले संस्कार जोपासले जातात. शासन पातळीवर कलावंतांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

हिंदवी रेणू राई गोंधळी समाज संघटनेच्या वतीने कलावंतांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी चे निवेदन आमदार जगताप यांना देण्यात आले. यावेळी कलावंत मानधन समितीचे उपाध्यक्ष दसरथ धुमाळ, शलिनी राठोड, सुनिता कलट, रूपाली राठोड, छाया लखारा, सविता बुरुडे, सुमन मोकाटे, मंगला डागवाले, संगीता बेरड, सिंधू सुडके आदी उपस्थित होते. धुमाळ म्हणाले, राज्यात कलावंतांचे प्रश्न प्रलंबित आहेत. शासनाकडून कलावंतांना मिळणारे मासिक मानधन तुटपुंजे आहे. तरी कलावंतांच्या मानधनात वाढ करून मिळावी. नगर जिल्हा हा राज्यामध्ये मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यासाठी १०० ऐवजी दोनशे कलावंतांची निवड करावी. आमदार जगताप यांच्यामुळे कलावंत मानधन समितीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीच्या माध्यमातून कलावंतांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देऊ, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...