आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरपंचायतीच्या गलथान कारभारामुळे नेवासा शहराला नागरी सुविधा पुरविल्या जात नसल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने मंगळवार (दि.२७) रोजी नेवासा नगरपंचायत चौकात उपोषण करण्यात येणार असल्याची आम आदमी पार्टीचे निवडणुक समिती प्रमुख अॅड. सादिक शिलेदार यांनी दिली.
नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनात आम आदमी पार्टीने म्हटले आहे की, शहराला नागरी सुविधा मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य नेवासकर प्रचंड हैराण झालेला असून एक ना अनेक सुविधांचे संकट उभे रहात असताना कराचा बोजा सर्वसामान्यांना भार बनत चालला आहे. शहरातील नागरिकांना शास्तीकर माफ झाला पाहिजे. शहरातून नगर पंचायत कार्यालय गावाबाहेर हलवू नये. हे कार्यालय गावाबाहेर हलवल्यास नेवासा शहरातील ९० टक्के नागरिकांना जाण्यायेण्याचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शहरातील व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नवीन गाळे वितरण प्रक्रिया पारदर्शकपणे लवकर करावी व शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, शहरात स्वच्छता गृह, क्रिडांगण, उद्यान व वाचनालय सुरु करावे, अशी मागणी निवेदनात केेली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष राजू आघाव, शहराध्यक्ष संदिप आलवणे, तालुका उपाध्यक्ष देवराम सरोदे, अण्णा लोंढे, अल्पसंख्याक आघाडी प्रमुख सलीम सय्यद, युवक आघाडी प्रमुख दिपक गायकवाड, स्वप्निल सोनकांबळे, बाळासाहेब साळवे, सोहेल शेख आदींच्या सह्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.