आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे गटाचा दावा:चितळेरोडचे शिवालय हेच आमचे कार्यालय ; स्व. अनिल राठोड यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन कामाला केली सुरुवात

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेतील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर बुधवारी दुपारी त्यांनी नेता सुभाष चौकातील शिवसेनेच्या शिवालयात स्व. अनिल राठोड यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन कामाला सुरूवात केली. शिवालय हे आमचे उर्जास्थान आहे. येथूनच कामकाज करणार आहे. आम्ही स्व. अनिल भैय्या यांनाच मानणारे आहोत. दुसऱ्या कार्यालयाची आम्हाला गरज नाही, अशा शब्दात शिंदे गटाने थेट शिवालयावर दावा ठोकला आहे. शिंदे गटाचे संपर्क प्रमुख सचिन जाधव, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी पत्रकारांशी बोलताना भूमिका मांडली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख सुभाष लोंढे, काका शेळके, अनिल लोखंडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर ते शिवालयात गेले होते. जुन्या-नव्यांना बरोबर घेऊन कामकाज करणार आहोत. अनेकजण संपर्कात आहेत. निवडणुकीला अद्याप वेळ असल्याने काही जण थांबले आहेत. स्व. अनिल राठोड यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व भाजपच्या सहकार्याने शहरात निर्माण करणार आहोत. येत्या १५ दिवसांत उत्तर जिल्हाप्रमुखांच्या नावाची घोषणा करण्यात येईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप हे हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आले आहेत. त्यामुळे आम्ही प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे नगर शहरासाठी मोठा विकास निधी देणार आहेत. शहरातील सर्व डीपी रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. तसेच पाणी योजनेची स्थिती बिकट झालेली आहे. यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना दिले आहेत. चारशे-पाचशे कोटी रूपयांचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार असल्याचे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...