आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:विद्यार्थ्यांच्या आनंदातच आमचे समाधान ; कुकरेजा‎

नगर‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय सिंधू सभेच्या वतीने‎ केलेल्या मदतीमुळे अपंग‎ संजीवनी मूकबधिर विद्यालय व ‎वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या ‎चेहऱ्यावरील आनंदातच आमचे ‎ ‎ समाधान आहे. भविष्यातही‎ असेच अनेक उपक्रम भारतीय‎ सिंधू सभेच्या वतीने राबवण्यात‎ येणार आहेत, असे प्रतिपादन‎ भारतीय सिंधू सभेच्या शहराध्यक्ष‎ रमेश कुकरेजा यांनी केले.‎ भारतीय सिंधू सभेच्या नगर‎ शाखेच्या वतीने सावेडी येथील‎ अपंग संजीवनी मूकबधिर‎ विद्यालय व वसतीगृहातील सर्व‎ विद्यार्थ्यांना उबदार ब्लँकेट्स,‎ दैनदिन उपोयोगी वस्तू व खाऊ‎ देण्यात आला. त्यावेळी ते बोलत‎ होते.‎ भारतीय सिंधू सभेच्या नगर‎ शाखेचे जिल्हाध्यक्ष दामोदर‎ बठेजा यांच्या संकल्पनेतून व‎ स्व.माणिकलाल कुकरेजा यांच्या‎ स्मरणार्थ थंडीचे दिवस असल्याने‎ हा उपक्रम राबवण्यात आला.‎

यावेळी शहराध्यक्ष रमेश‎ कुकरेजा, सदस्य जितेश सचदेव,‎ सागर बठेजा, राहुल बजाज,‎ मुकेश असनानी, किशन‎ पंजवानी, बन्सी असनानी, द्वारका‎ किंगर, मन्नू कुकरेजा, पप्पन‎ तलरेजा, किशोर रंगलानी, सुनील‎ बजाज, नंदलाल बजाज, अशोक‎ आहुजा, दीपक मेहतानी, रुपचंद‎ मोटवानी, वसतिगृहाचे प्राचार्य‎ दिलीप जगधने आदी उपस्थित‎ होते. यावेळी सतनाम साक्षी‎ गोशाळेच्या वतीनेही मूकबधिर‎ विद्यालय व वसतीगृहास पाच‎ हजार रुपयांची मदत देण्यात‎ आली.

‎जिल्हाध्यक्ष दामोदर बठेजा‎ म्हणाले, यावर्षी मोठ्या प्रमाणावर‎ पाऊस पडला आहे. त्यामुळे यंदा‎ थंडीही भरपूर पडणार आहे.‎

भारतीय सिंधू सभा सामाजिक‎ जाणीवेतून सर्वांसाठी काम करत‎ आहे. येथील वसतीगृहात‎ सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी‎ आहेत. त्यांच्याकडे उबदार‎ ब्लँकेट्स नसल्याने सिंधी‎ समाजाचे सामाजिक कार्यकर्ते‎ स्व.माणिकलाल कुकरेजा यांच्या‎ स्मरणार्थ त्यांच्या परिवाराच्या‎ वतीने येथे उबदार ब्लँकेट्स‎ देण्यात आली.‎ संस्थेचे प्राचार्य दिलीप जगधने‎ यांनी केलेल्या मदती बद्दल आभार‎ मानले. सूत्रसंचालन अशोक‎ अहुजा यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...