आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:पाचेगाव- खिर्डी रस्त्याचे काम स्वखर्चाने लावले मार्गी; माजी सभापती सुनीता गडाख यांचा ग्रामस्थांकडून नागरी सत्कार

सोनई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे तालुक्यातील पाचेगाव येथे ४० वर्षांपासून पाचेगाव-खिर्डी रस्त्याचा प्रश्न बिकट झाला होता. त्या रस्त्यावरून चालताना विद्यार्थी व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होती. या रस्त्याची दुरुस्तीची मागणी शेतकरी, ग्रामस्थांनी माजी सभापती सुनीता गडाख यांच्याकडे केली. गडाख यांनी निधी उपलब्ध नसताना देखील स्वखर्चाने या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला.

गावात असलेले इतरही प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे गडाख यांनी सांगितले. गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन गावाचा विकास साधावा, व्यक्तिगत मतभेदांमुळे विकास खुंटतो. त्यात गावचे नुकसान होते. त्याला जबाबदार गावातील उपद्रवी लोक असतात. मात्र त्यात गावचे नुकसान होते. मात्र याकडे दुर्लक्ष करून आपण काम करत राहायचे असेही, त्या म्हणाल्या. पाचेगाव-खिर्डी रस्ता खडीकरण व मजबुती करणासाठी रस्ता मंजूर झाला. परंतु ग्रामपंचायतीच्या चुकीच्या धोरणामुळे या कामाचे टेंडर हे वर्षांपूर्वी होणे गरजेचे असूनही झाले नाही. परंतु आता तत्काळ सुरू करावे, यासाठी गावातील ग्रामविकास अधिकारी यांना घटनास्थळी बोलवून काम सुरू करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी यांनी दोन दिवसांत काम सुरू करण्याचा शब्द दिला. सुनीता गडाख यांनी गावातील गणेश मंडळाना भेट देत आरती केली. पाचेगाव-खिर्डी रस्त्याचा प्रश्न स्वखर्चातून मार्गी लावल्याबद्दल माजी सभापती सुनीता गडाख यांचा पाचेगाव ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी अशोक कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच दिगंबर नांदे, माजी संचालक भागवत पवार, दादासाहेब जाधव, गंगाधर मतकर, बाळासाहेब टिक्कल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विक्रांत पवार, अशोक पवार, जावेद शेख, पंढरीनाथ शिंदे, विष्णू मतकर, ग्रामपंचायत सदस्य वामनराव तुवर, बाबासाहेब मतकर, किसन मतकर, मंजाबापू माळी, भय्या पटेल, गोकुळ तुवर, बाळासाहेब शिंदे, जगन्नाथ मतकर, निवृत्ती जाधव, भगीरथ घोगरे, बंडू रासकर, सुभाष माळी, मच्छिंद्र जाधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...