आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:शहर सहकारी बँकेत पद्मशाली समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे

नगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर सहकारी बँक ही सर्वसामान्य कामगार, छोटे व्यासायिक, कष्टकरी वर्गाची बँक म्हणून जिल्ह्यात परिचित आहे. बँकेचे संस्थापक स्व.मुकुंदराव घैसास यांनी सर्व समाजातील लोकांना एकत्र करुन चांगल्या प्रकारे बँकेचा कारभार केला. बँकेच्या विकासात पद्मशाली समाजाचेही योगदान राहिले आहे. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत यंदाही पद्मशाली समाजाला प्रतिनिधीत्व द्यावे, अशी मागणी पॅनेल प्रमुख सुभाष गुंदेचा व गिरिष घैसास यांच्याकडे करण्यात आली आहे. स्व.मुकुंदराव घैसास यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची जाणिव सर्व समाज बांधवांना आहे.

याची जाणिव ठेवून सरांच्या मागे समाजही उभा राहिला. सन २०१५ च्या निवडणुकीतही समाजाचा उमेदवार दुसर्‍या पॅनेलमध्ये असतानाही समाज सरांच्या मागे उभा राहिला. याचा व विडी कामगार, विणकर, पद्मशाली समाजातील मोठ्या संख्येने असलेल्या मतदारांच्या भावनांचा विचार करुन पद्मशाली समाजाला आपल्या पॅनेलसह बँकेत प्रतिनिधीत्व द्यावे, अशी विनंती अध्यक्ष संजय वल्लाकट्टी यांनी केली आहे.

त्यांच्या मागणीस मार्कंडेय मंदिर देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारम, पंच कमेटी ज्ञाती समाजाचे सेक्रेटरी मल्लेशाम इगे, विश्वस्त संजय बाले, पुरुषोत्तम सब्बन, पद्मशाली संघमचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दत्तात्रय रासकोंडा, यूथ फेडरेशनचे श्रीनिवास बोज्जा, युवक संघमचे अभिजित चिप्पा, पांडूरंग गोणे, नारायण कोडम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...