आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अटी-शर्ती घालून महाराष्ट्रातील प्रमुख संस्थानांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली असून या पादुकांबरोबर जाणाऱ्या २० जणांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. बहुतांशी पादुका सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.
आषाढी वारी दोन दिवसांवर आली असताना नगर जिल्हा प्रशासनाने विविध देवस्थाने व संस्थानांच्या दिंड्यांऐवजी पादुका घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. संत एकनाथ महाराज संस्थान (पैठण), संत निवृत्तिनाथ महाराज संस्थान (त्र्यंबकेश्वर), संत सोपानदेव महाराज संस्थान (सासवड), संत मुक्ताबाई संस्थान (मुक्ताईनगर, जळगाव), विठ्ठल -रुक्माई संस्थान (कौंडिण्यपूर, अमरावती), संत तुकाराम महाराज संस्थान (देहू), संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (आळंदी), संत नामदेव महाराज संस्थान (सोलापूर) व संत निळोबाराय संस्थान (पिंपळनेर, जि. नगर) या प्रमुख १० संस्थानांना पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यास परवानगी मिळाली आहे. या पादुका ३० जूनला रात्री अकरापर्यंत पंढरपूरमध्ये पोहोचतील, एसटी किंवा अन्य वाहनाद्वारे पंढरपूरकडे घेऊन जाता येईल. दरम्यान, पिंपळनेर येथील निळोबाराय पादुकांबरोबर जाणाऱ्या २० जणांची प्रशासनाने कोरोना चाचणी केली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असे नगरचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
पंढरपुरात १ जुलैला संचारबंदी, ९ पालख्या विमानाने येणार
सांगली : आषाढी एकादशी दिनी १ जुलै रोजी पंढरपुरात राज्यभरातील मानाच्या नऊ पालख्या विमानाने दाखल हाेतील. या दिवशी गर्दी हाेऊ नये म्हणून मंदिर परिसरात संचारबंदी लागू केली अाहे. संतांच्या पादुका आणि त्यांच्या गाठीभेटी २ जुलैला घेता येतील. पहिल्या दिवशी पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून यावर ३० जूनला अंतिम निर्णय हाेणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.