आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आल्यामुळे शहरात सकाळपासूनच गुढीपाडवा सणाचा उत्साह दिसून आला. ठिकठिकाणी सडा, रांगोळ्या, गुढ्या उभारून गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरातून महिलांची मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी फेटे आकर्षक साड्या व नागरिकांनी पारंपारिक वेशभूषा धारण केल्या होत्या. ढोल ताशांच्या गजरात नववर्षाचे उत्साहात स्वागत केले. येथील साईगाव पालखी सोहळ्याचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने पहाट पाडवा भक्ती गिते, भूपाळी, लोकगिते आदी सुमधूर गिते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
संगीत समारंभाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष भागचंद ठोळे यांनी केला होते. तिच परंपरा उद्योजक कैलास ठोळे, सुधा ठोळे, राजेश ठोळे, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे अध्यक्ष विजय बंब यांनीही जपत आजही सुरू ठेवली. साई गाव पालखी सोहळा, मुंबादेवी तरुण मंडळ, ज्येष्ठ नागरिक सेवा मंच, शारदा संगीत विद्यालयाच्या वतीने सुरभी कुलकर्णी व बालगोपालांनी विविध गिते सादर करत उत्साहात पहाट पाडवा साजरा केला. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी गीत गायन करून श्रोत्यांची वाहवा मिळवली.
यावेळी वाहतूक निरीक्षक झालेल्या कोपरगावची कन्या वाघ, शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले व कलावंतांचा सन्मान करण्यात आला. समारंभासाठी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या पुष्पाताई काळे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, ऐश्वर्या सातभाई, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, दत्तोपंत कंगले, उत्तम शहा, शैलजा रोहोम, रजनी गुजराथी, शोभाताई ठोळे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.