आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल वारी:निरोगी आरोग्य, प्रदूषण मुक्तीसाठी पंढरीची ‘सायकल वारी’; पार्श्वभूमीवर पंढरपूर वारी निमित्त नगर ते पंढरपूर अशी सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे

नगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी कोरोनाचे निर्बंध हटवल्याने आषाढीनिमित्त वेगवेगळ्या दिंड्या पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होणार आहेत. लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत वारीला जातात. मात्र अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशन निरोगी आरोग्य आणि प्रदूषण मुक्त परिसराचा संदेश देत १०० पेक्षा जास्त सायकलिस्ट २ व ३ जुलै २०२२ रोजी सायकलीवर पंढरपूरला निघणार आहेत.

पर्यावरणाचा समतोल राखला जावा सर्वांना व्यायामाची गोडी लागावी अशी विविध उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवून अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशनचे सायकल वारी सुरू केली आहे. यावर्षी पंढरपूर सायकल वारीचे हे चौथे वर्ष आहे. पंढरपूरची वारी हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. पंढरपूर म्हटले की विठ्ठल डोळ्यासमोर येतो. गेली अठ्ठावीस युगे तो भक्तांची वाट पाहत उभा आहे. पण आपल्या उद्योग व्यवसायामुळे आपण पायी दिंडी साठी इतके दिवस जाऊ शकत नाही. पण आपण सायकल वर दोन दिवसांत जाऊन येऊ शकतो. पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीने प्रदूषणमुक्त प्रवास म्हणून सायकल हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळेच सायकल प्रवासाचा अधिकाधिक प्रचार-प्रसार करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर वारी निमित्त नगर ते पंढरपूर अशी सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे.

असा राहील सायकल वारीचा प्रवास
२ जुलै : नगर हून पहाटे ६ वाजता रुईछत्तीशी - करमाळा - टेंभुर्णी - मार्गे पंढरपूर कडे रवाना. मुक्काम पंढरपूर (एकूण २१० किमी).

बातम्या आणखी आहेत...