आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे - बहीण भावात दिलजमाई:पक्षाने आदेश दिला तर पाथर्डीतून विधानसभा निवडणूक लढवणार; पंकजा मुंडे यांचे वक्तव्य

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पक्षाने जबाबदारी दिली तर आगामी विधानसभा निवडणूक पाथर्डीतून लढवणार, असे विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता पंकजा मुंडे परळीतून लढणार की पाथर्डींतून अशी चर्चा रंगू लागली आहे. तर कालच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्या बहीण- भावातील अंतर कमी झाले म्हटल्याने, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर चर्चा सुरू झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील भारजवाडी गावात नारळी सप्ताह सुरू होता. यावेळी कार्यक्रमास भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले आहे. यावेळी तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री उपस्थित होते. यामुळे बहीण- भाऊ यापुढे एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार नाही की काय अशा चर्चांना उधाण आले आहे.

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून 2014 सालपासून मोनिका राजळे या भाजपच्या आमदार आहेत. त्याचे पती दिवगंत राजीव राजळे हे काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले होते. यामुळे भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे हे म्हणाले आहे की, कोणी कोणत्या जागेवरून निवडणूक लढवावी, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या केंद्रीय संसदीय बोर्डाला आहे.

मतदारसंघातील वातवरण कसे?

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात नेहमी विविध घडामोडींमुळे चर्चेत असणाऱ्या पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात सध्या विद्यमान भाजप आमदार मोनिका राजळे गटबाजीने त्रस्त असल्याचे दिसून येत आहे. यात पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याने पुढील विधानसभा निवडणुकीला त्यांचा पत्ता कट होणार की काय. वकील प्रताप ढाकणे हे देखील मतदारसंघातून उमेदवारीसाठी आक्रमक ईच्छूक आहेत. नगर जिल्ह्यात सर्वाधिक 3 लाख 40 हजार 393 मतदार असलेल्या या मतदारसंघात मराठा व वंजारी समाजाचे प्राबल्य आहे. वंजारी समाजावर ज्येष्ठ नेते दिवगंत गोपीनाथ मुंडे यांचा पगडा आहे. या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर होत असलेली यंदाची चौथी विधानसभा निवडणूक आहे. एकूण मतदानापैकी शेवगाव तालुक्यातील मतदारांची संख्या 1 लाख 89 हजार 85 तर पाथर्डी तालुक्यातील मतदारांची संख्या 1 लाख 51 हजार 308 आहे. पाथर्डी तालुक्यापेक्षा 38 हजार जास्त मतदान शेवगाव तालुक्याचे आहे.

तालुक्यातील समस्या काय?

  • पाथर्डी आणि शेवगाव हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त आहेत.
  • त्यामुळे या दोनही तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.
  • या मतदारसंघात ऊस तोडणी कामगार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न असून प्रत्येक निवडणुकीत यावर बोलले जाते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांनी 1,12,509 मतदान घेत विजयी झाल्या होत्या. तर 2014 मध्येही त्यांना 1 लाख 34 हजारांवर मतदान झाले होते.

संबंधित वृत्त वाचा

कटुता संपली?:माझा भाऊ मोठा झाल्याचा मला आनंदच-पंकजा मुंडे; आमच्यात सुईच्या टोकाएवढेही वैर नाही- धनंजय मुंडे

एकमेकांचे वाचा सविस्तर