आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशाची परंपरा:परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयाची यशाची परंपरा कायम ; विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के निकाल

पिंपरणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा निकालात पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली.

बारावीत विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के, कला शाखेचा निकाल ६८.०८ टक्के लागला. दहावीचा निकाल ९८.६६ टक्के लागला आहे. बारावी सायन्स मध्ये बैरागी श्लोक मोहनदास हा ८६ टक्के गुण मिळवून, कला शाखेत गुंजाळ श्वेता सर्जेराव ७३.३३ व इयत्ता दहावी मध्ये कुमारी पानसरे अश्विनी रमेश ही ८४.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी व त्यांची टक्केवारी पुढील प्रमाणे : बारावी सायन्स- श्लोक मोहनदास बैरागी ८६, सोनल लहानू निळे ८५.१७, संस्कृती राजेंद्र पवार ८५, प्रतीक पाराजी सोनवणे ८२, ऋषिकेश सुनील गाडेकर ८०.३३,साक्षी रामनाथ दिघे ७४.८३,प्रतीक्षा सुरेश सांगळे ६८.८३, गौरी सोमनाथ खेमनर ६८.३३,सुषमा अरुण चव्हाण ६५.५०, प्रतिभा राजू सानप ६५, सोमेश्वर बाबासाहेब राहिंज ६४.३३. कला शाखेतील विद्यार्थी- श्वेता सर्जेराव गुंजाळ ७३.३३,साक्षी राजेंद्र चव्हाण ६९.१६, युवराज साहेबराव सांगळे ६८.०५, मोनिका गणपत पानसरे ६७.०५, वर्षा रोहिदास राऊत ६४.८३. इयत्ता दहावी- अश्विनी रमेश पानसरे ८४.८०,कांचन दत्तात्रय राहिंज ८१.४०, साक्षी सोमनाथ खेमनर ८०.२०, मयुरी संतोष जोर्वेकर ७९.२०,ऋतुजा अजित पवार ७८.४०.

बातम्या आणखी आहेत...