आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर:परभणीचा प्रमोद साकारणार रांगोळीतून शिवराज्याभिषेक

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी (६ जून) ३४२ वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. अहमदनगरमध्ये स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना आणि मराठा सेवा संघाच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनाचे आयोजन छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे. यावेळी परभणी येथील शेतकरी कुटुंबातील प्रमोद उबाळे हा विद्यार्थी कलाकार शिवराज्याभिषेक दिन सोहळा रांगोळीच्या माध्यमातून साकारत आहे.

वयाच्या तेराव्या वर्षापासून प्रमोद उबाळे हा रांगोळी कला जपत आला आहे .त्याचे वडील शेती काम करतात. मराठवाड्यातून येऊन त्याने अल्पावधीतच आपल्या कलागुणांची चुणूक दाखवली आहे; त्यामुळेच स्मायलिंग अस्मिताने प्रमोदला राज्याभिषेक साकारण्यासाठी विनंती केली व त्यास प्रमोदने संमती दर्शवत मोफत रांगोळीतून शिवराज्याभिषेक सोहळा काढण्याचे ठरवले.सोबतच प्रमोदने गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवरायांवर आधारित रांगोळ्या मोफत काढत छत्रपतींविषयी ऋण व्यक्त करत असतो. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी नगर शहरातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील, अशी माहिती स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...