आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (२६ जून) कांद्याची आवक काही प्रमाणात वाढली असून शेतकऱ्यांनी सुमारे 4050 कांदा गोण्या विक्रीसाठी आणल्या होत्या. पारनेर बाजार समितीमध्ये यावेळी झालेल्या लिलावात 7 ते 8 लॉटला सर्वाधिक प्रतिक्विंटल 1300 ते 1800 रुपये भाव मिळाला. एक नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 1000 ते 1200 रुपये भाव मिळाला.
सध्या शेतकरी खरिपाची पेरणी करीत आहेत. त्यामुळे खते व बियाण्यासह शेतीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. त्यामुळे शेतकरी सध्या भाव कमी असूनही कांदा चाळीत ठेवलेला कांदा काही प्रमाणात विक्रीसाठी काढताना दिसत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात मागील रब्बी हंगामात 1 लाख 90 हजार 529 हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. यातून भरघोस उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले. मात्र, तीन महिन्यांपासून कांद्याच्या भावात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी काढत नव्हते. परंतु सध्या खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी नाईलाजास्तव कांदा विक्रीसाठी काढताना दिसत आहेत. तसेच पावसाळ्यात कांदा खराब होण्याचा जास्त धोका असतो. त्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी काढत अाहेत. पारनेर बाजार समितीमध्ये रविवार, बुधवार व शुक्रवार अशी आठवड्यातील तीन दिवस कांद्याचा लिलाव होतो. रविवारी (२६ जून) पारनेर बाजार समितीत कांद्यचे लिलाव झाले. यावेळी सुमारे 4 हजार 50 कांदा गोण्यांची आवक झाली होती. यातील 7 ते 8 लॉटला प्रतिक्विंटल सर्वाधिक म्हणजे 1300 ते 1800 रुपये भाव मिळाला. एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 1000 ते 1200 रुपये भाव मिळाला, तर दोन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 700 ते 900 रुपये भाव मिळाला, तर तीन नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 200 ते 600 रुपये भाव मिळाला, अशी माहिती पारनेर बाजार समितीचे सचिव शिवाजी पानसरे यांनी दिली.
कांद्याची आवक किंचित वाढली
कांद्याच्या भावात घसरण झाल्यामुळे शेतकरी रब्बीतील कांदा विक्रीसाठी काढत नव्हते. परंतु सध्या खरीप पेरणीचा हंगाम सुरू असल्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी काढताना दिसत आहेत. पारनेर बाजार समितीत 12 जून रोजी 3 हजार 637 कांदा गोण्यांची आवक झाली होती. त्या तुलनेत रविवारी (२६ जून) बाजार समितीत 4 हजार 50 कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याची आवक काही प्रमाणात वाढली आहे, असे पारनेर बाजार समितीचे सचिव शिवाजी पानसरे यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.