आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधवा महिलांसाठी अवमानकारक ठरणारी अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव पारनेर नगरपंचायतीचा आज, मंगळवारी झालेल्या विशेष सभेत एकमताने मंजूर करण्यात आला असल्याची माहिती उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर यांनी दिली. विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव करणारी पारनेर नगरपंचायत ही राज्यातील पहिली नगर पंचायत ठरली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव घेतल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील ग्रामपंचायतींनी ‘हेरवाड पॅटर्न’ राबवावा, असे आवाहन केले आहे.या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये विधवा महिला प्रथा बंद करण्यासंदर्भात ठराव घेतले आहेत.मात्र अद्याप कोणत्याही नगरपंचायतीने अशा प्रकारचा ठराव घेतलेला नाही.त्यामुळे पारनेर नगरपंचायत विधवा महिला प्रथा बंद करण्याचा ठराव घेणारी राज्यातील पहिली नगरपंचायत ठरली असल्याचा दावा उपनगराध्यक्ष भालेकर यांनी केला
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रियंका औटी यांनी विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.त्यांना समाजात सन्मानाने वावरता यावे यासाठी पारनेर नगर पंचायतीच्या हद्दीत विधवा महिला प्रथा करण्यात यावी अशा आशयाचा ठराव मांडला. या ठरावावर चर्चा होऊन ठराव मंजूर करण्यात आला.केवळ ठराव करून थांबता येणार नाही तर कृतीशील जागृती करून विधवा महिला प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत अश्या आशयाच्या सूचना विशेष सभेदरम्यान चर्चा करताना उपस्थित नगरसेवकांनी केल्या. पतीच्या निधनानंतर पत्नीच्या बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे,धार्मिक कार्यक्रमात विधवा महिलांवर टाकण्यात आलेला अघोषीत बहिष्कार या बाबी विधवा महिलांच्या सन्मानाला ठेच पोहचवणाऱ्या व कायद्याचा भंग करणाऱ्या असल्याने विधवा महिला प्रथा बंद करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने प्रभागात जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पारनेर नगर पंचायतीच्या सभेत विधवा महिला प्रथा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजसुधारक राजाराम मोहनरॉय यांनी अनिष्ट सती प्रथेविरोधात जनजागृती केली.सती प्रथा बंद करण्यास भाग पाडले. विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी पारनेर नगर पंचायतीने पहिले पाऊल उचलले आहे.यासंदर्भात जनजागृती करण्यात येईल.'' सुरेखा भालेकर, उपनगराध्यक्ष, पारनेर नगर पंचायत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.