आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा मॉडेल करणार:पारनेर मतदार संघातील सर्व शाळा मॉडेल करणार : लंके

नगर तालुका4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे. नगर पारनेर मतदार संघातील सर्व शाळा शिक्षणाच्या बाबतीत राज्यात मॉडेल झाल्या पाहिजे यासाठी पूर्ण प्रयत्न करणार .२०२२ या वर्षात मतदार संघातील सर्व शाळा हाय डिजिटल शाळा बनवणार. मुले शिकले तर भावी पिढी उज्वल होईल, विद्यार्थी हे उद्याचं देशाचं भविष्य आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.

चास येथील श्रीनृसिंह विद्यालय, हिंदुस्थान फीड्स प्रा. लि. व श्रीस्वामी समर्थ दूध संकलन व शीतकरण केंद्र, चास यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम प्रंसगी ते बोलत होते. यावेळी हिंदुस्थान फिड्सचे डॉ. अशोक झरेकर, विक्री अधिकारी विवेक गौड, विलास गायकवाड, भुपेश सोनावणे, बाळासाहेब कार्ले, अशोक शिंदे, मुख्याध्यापक अकोलकर, रंगनाथ सुंबे, शिवाजी पठारे, विश्वास चेडे, विनायक कार्ले, राजेंद्र कार्ले आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...