आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पारनेरचा धक्का:शिवसेनेचे 5 नगरसेवक राष्ट्रवादीत; अजित पवारांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

पारनेर (जि. नगर)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नव्यांचा सन्मान, जुन्यांनाही मान देण्याचे आमदार लंके आश्वासन

शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उमा बोरुडे यांच्यासह पारनेर नगरपंचायतीत (जि. नगर) शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार नीलेश लंके यांच्या खेळीमुळे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे अनेक नगरसेवक आमदार लंके यांच्या संपर्कात होते. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच हा पक्षप्रवेश करण्याचा लंके यांचा प्रयत्न होता, परंतु काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याचा हट्ट धरल्यामुळे शनिवारी बारामतीमध्ये प्रवेशाचा सोहळा पार पडला. दुपारी उमा बोरुडे यांच्यासह डॉ. मुदस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी व किसन गंधाडे यांच्या गळ्यात पक्षाचा पंचा टाकून पवारांनी त्यांचे स्वागत केले.

नव्यांचा सन्मान, जुन्यांनाही मान देण्याचे आश्वासन

पक्ष प्रवेशनंतर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या विश्रामगृहात लंके यांच्या उपस्थितीत नव्या जुन्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या वेळी पक्षात नव्याने आलेल्या कार्यकर्ते तसेच जुन्यांचीही मान, सन्मान तसेच प्रतिष्ठा जपण्यात येईल,असे आश्वासन आमदार लंके यांनी दिले.

0