आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णपदक‎:प्रवरा स्कूलच्या पार्थला राष्ट्रीय‎ धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक‎

लोणी‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ‎ इंडिया आणि क्रीडाभारती फौंडेशन‎ भोपाळ, मध्यप्रदेश यांच्या संयुक्त‎ विद्यमाने आयोजित १३ व्या राष्ट्रीय‎ फिल्ड इनडोअर आर्चरी‎ (धनुर्विद्या) स्पर्धेत प्रवरानगर‎ येथील प्रवरा पब्लिक स्कूलच्या‎ पार्थ वळवी या विद्यार्थ्याने यश‎ संपादन करून सुवर्णपदक‎ पटकावले, अशी माहिती प्राचार्य‎ डॉ. बाळासाहेब अंबाडे यांनी‎ दिली.‎

पार्थ वळवी याने १७ वर्ष‎ वयोगटात इंडियन राउंड बेअर बो‎ प्रकारात प्रथम क्रमांकासह‎ सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या‎ यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि‎ महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे‎ पाटील, जिल्हा परिषदच्या माजी‎ अध्यक्ष शालिनी विखे व संस्थेच्या‎ इंग्रजी विभागाच्या संचालिका‎ सुश्मिता विखे पाटील, शिक्षण‎ संचालिका लीलावती सरोदे यांनी‎ पार्थचे विशेष कौतुक केले. पार्थ‎ यास प्राचार्य डॉ. बी. बी अंबाडे,‎ मुख्याध्यापक के. टी. आडसूळ,‎ क्रीडा संचालक डी. के. जाधव व‎ यांचे मार्गदर्शन लाभले.‎

बातम्या आणखी आहेत...