आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलजोडींचे पूजन:नांदगाव तालुक्यातील धामक येथे तान्हा पोळ्यात 55 चिमुकल्यांचा सहभाग

नांदगाव खंडेश्वर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील धामक येथील श्री संत गजानन महाराज संस्थानात पार पडलेल्या तान्हा पोळ्यात जवळपास ५५ चिमुकल्यांनी आपापल्या बैलांसह सहभाग नोंदवला. नरेंद्र बावणे यांनी गुढी आणून बैलजोडींचे पूजन केले. दर्शन शेंडे, कार्तिक शेंडे, ओम गुळदे, यश ठाकरे व पियांश जगताप हे अनुक्रमे पहिल्या पाच पुरस्कारांचे मानकरी ठरले, तर सहभागी स्पर्धकांचाही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बबन मेश्राम, सहदेव चौधरी, चंद्रभान राजूरकर, वसंत काकडे, राजू निमजे, सरपंच जयदीप काकडे, तुकाराम बोकडे, संजय ठाकरे, आकाश झाडे, अमोल इंगोले, विजय दुधमोचन, मयूर मोहुर्ले, नरेंद्र बावणे, पवन ठाकरे, दीपक म्हस्के, गणेश तायडे, मंगेश ढोले, राहुल वैष्णव, अक्षय पेटकर, व्यंकटेश ढोले, भूषण निराळे, सनी मेश्राम, जय नाईकवाड, शुभम नाईकवाड, तुषार मोहुर्ले व ग्रामस्थ उपस्थित होते.

घोटा येथे तान्हा पोळ्यात चिमुकल्यांचा सहभाग
तिवसा तालुक्यातील घोटा येथे लहान मुलांचा पोळा सकाळी ८ वाजता वॉर्ड नं. २ मध्ये भरवण्यात आला होता. यामध्ये ६० चिमुकल्यांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये काही चिमुकल्यांनी हातांनी बनवलेले बैल, तर काहींनी रेडिमेड सजावट केलेल्या बैलांसह हजेरी लावली होती. मुलांना खाऊ वाटप करून तान्हा पोळ्याचा समारोप करण्यात आला.

मूर्तिजापूर तरोडा येथे तान्हा पोळा उत्साहात
मूर्तिजापूर तरोडा येथे श्री सत्यसाई समिती व मूर्तिजापूर तरोडा मित्रमंडळाच्या संयुक्त सहकार्याने स्थानिक आठवडी बाजार चौकात तान्हा पोळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. बाजार चौकात आंब्याच्या पानांचे व रंगीबेरंगी तोरण बांधून रांगोळ्या काढण्यात आल्या. या तोरणा खाली गावातील २०० बालगोपाल शेतकऱ्यांची वेशभूषा धारण करत आपल्या बैलजोड्यांसह पोळ्यात हजर होते. या वेळी नागरिकांनी झडत्या, महादेवाचे गाणे, भजन गायले. गुढीचा मान सतीश सहारे यांना देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते बैलांचे पूजन करण्यात आले.

या वेळी झालेल्या स्पर्धेत स्वराज कांबळे, साहिल चरडे, अभिश अभिजित वेरूळकर यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे, तर प्रोत्साहनपर पुरस्काराने अनुष्का वेरूळकर, सुमित जगनाडे, राज वेरूळकर, धानी वेरूळकर, अनंत वेरूळकर, सोहम वेरूळकर, सुहानी शिर्के, आदित्य शेलोकार यांना गौरवण्यात आले. परीक्षक म्हणून विनोद जिरापुरे व नितीन कांबळे यांनी जबाबदारी पार पाडली. या प्रसंगह विनोद वेरूळकर, पंढरी अळसपुरे, विठ्ठल मेश्राम, प्रवीण अळसपुरे, संजय कांबळे, दिलीप ठवळी, नरेंद्र वेरूळकर, दीपक राऊत, अमोल वेरूळकर, अभिजित वेरूळकर, राजू शिर्के, आकाश मोहोड, विष्णू ठवकर, प्रीतम वेरूळकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...