आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परेड:मैकनाईज्ड इन्फंट्री सेंटरमध्ये पासिंग आऊट परेड

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संचलन : भारतीय सैन्याच्या यांत्रिक पायदळ रेजिमेंटमध्ये एकूण ८० रिक्रूटांनी केले लष्करी प्रशिक्षण पूर्ण

अहमदनगर येथील मैकनाईज्ड इन्फंट्री सेंटर आणि स्कूलमध्ये शुक्रवारी भारतीय सैन्याच्या यांत्रिक पायदळ रेजिमेंटमध्ये एकूण ८० रिक्रूट त्यांचे मूलभूत आणि प्रगत लष्करी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणित करण्यात आले. यावेळी रिक्रुट पासिंग आऊट व अटेस्टेड परेड झाली.

प्रभावी पोशाख आणि सुसज्जित रिक्रूटद्वारा प्रभावशाली परेडची समीक्षा मैकनाईज्ड इन्फंट्री सेंटर आणि स्कूलचे कमांडेट ब्रिगेडियर रसेल डिसूजा यांच्याद्वारे करण्यात आली. भारतीय सेनेच्या सर्वोच्च परंपरांचे पालन करून मेजर माने, नीलेश संदीप यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज आणि मैकनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट कलर्स यांच्या उपस्थितीत भर्ती झालेल्यां रिक्रूटांनी कर्तव्यनिष्ठेची शपथ घेण्यात आली. नव्याने नियुक्त झालेल्या सैनिकांना संबोधित करताना रिव्ह्यू ऑफिसरने भरती झालेल्यांना मैकनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या समृद्ध वारशाची आणि अभिमानाची आठवण करून दिली. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना अभिमानाने, अत्यंत प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने भारतीय सैन्यातील पूर्ण सैनिक म्हणून आपले कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले.

रिक्रूट रिंकल सिंगला एकूण गुणवत्तेत प्रथम स्थान मिळाले आणि त्याला जनरल सुंदरजी सुवर्णपदक, रिक्रूट आलोक सिंगला लेफ्टनंट जनरल केएल डिसूजा सिल्व्हर मेडल आणि रिक्रूट विशाल खंतवाल यांना लेफ्टनंट जनरल पंकज जोशी कांस्यपदक मिळाले. प्रत्येक रिक्रूटला त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांच्या पालकांना ‘गौरव पदक’ प्रदान करण्यात आले.