आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना आकसबुद्धीने अटक केल्याबद्दल व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घटनात्मक पदावरून महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ पाथर्डी तालुका शिवसेनेतर्फे प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांना शिवसेना तालुकाप्रमुख भगवान दराडे यांनी निवेदन दिले.
याप्रसंगी तहसीलदार श्याम वाडकर उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना नेते खासदार राऊत यांना आकस बुद्धीने केलेली अटक व राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्र मराठी माणसाचा अपमान करून प्रांतीयवाद निर्माण केला या दोन्ही घटनांचा आम्ही निषेध करत आहोत. निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख दराडे, उप तालुकाप्रमुख उद्धव दुसंगे, शिवसेना दलित महाआघाडीचे अंबादास आरोळी, भाऊसाहेब धस, सुनील परदेशी, अक्षय उराडे, शहर प्रमुख सागर राठोड, संभाजी जेधे, अजिनाथ गीते, अनिल भापकर, अजिनाथ भापकर, आदेश काकडे, सुरेश हुलजुते, महादेव राहटे, सुभाष कराळे आदिंच्या सह्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.