आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडा आणि खून:पाथर्डी तालुक्यात सशस्त्र दरोडा आणि खून: 80 वर्षांच्या वृद्धाचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी, ग्रामस्थ संतप्त

पाथर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगरच्या करंजी गावापासून एक किमी अंतरावर शुक्रवारी रात्री सशस्त्र दरोडा आणि खून झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या करंजी गावाजवळ कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.

पतीचा मृत्यू पत्नी गंभीर

या ठिकाणी भावले वस्तीवर दरोडा पडला. तसेच दरोडेखोरांनी गोपीनाथ लक्ष्मण भावले (80) यांना लाकडाने बेदम मारहाण केली. त्यातच गोपीनाथ यांचा मृत्यू झाला. दरोखोरांनी बचाव करणाऱ्या गोपीनाथ यांच्या पत्नी शांताबाई (76) यांना देखील मारहाण केली. त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

ग्रामस्थ संतप्त

दरोडा आणि हत्येची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक मनोज पाटील, उपाधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यांनीच या घटनेच्या तपासासाठी पोलिसांची पथके नेमली असून आता गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. दरोड्यावेळी भावले वस्तीवर घरामध्ये गोपीनाथ लक्ष्मण भावले आणि शांताबाई गोपीनाथ भावले हे दोघेच होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोठा ऐवज चोरीला गेलेला नाही.

दरम्यान, गावकऱ्यांनी या घटनेनंतर पोलिस आणि प्रशासनावर आपला रोष व्यक्त केला. तसेच काही काळ रस्ता बंद केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढली तसेच गुन्हेगारांना शोधून काढले जाणार असे आश्वस्त केले.

बातम्या आणखी आहेत...