आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील वाढती अतिक्रमणे व त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी पाहता स्थानिक प्रशासनाने सोमवारपासून (१४ नोव्हेंबर) शहर हद्दीतील महामार्ग व राजमार्गावरील स्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटवण्याचा कृती आराखडा तयार केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महसूल, पोलिस, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांध काम व पालिका प्रशासक संयुक्त मोही हटाती घेण्यात येऊन जिल्हा पोलिस प्रमुखांनी यासाठी विशेष बंदोबस्त मंजूर केला आहे.
बाबूजी आव्हाड महाविद्यालयापासूनउपजिल्हा रुग्णालय, अजंठा चौकापासून संस्कार भवन, बाजार तळ परिसर, नाईक चौक ते पोळा मारुती मंदिर, जिल्हा बँक चौकापासून जॉगिंग पार्क पर्यंत, आंबेडकर चौकापासून नवी पेठ, क्रांती चौक ते अजंठा चौक अशा प्रमुख रस्ता व बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविण्याबाबतचे नियोजन पूर्ण झाले आहे.
शहरात वडापाव, चहा विक्रेते, फळ विक्रेते आदींची रस्त्यावरील अतिक्रमणे वाढुन प्रमुख महामार्गावर वाहतूक कोंडी, किरकोळ अपघात वाढले आहेत. अजंठा चौकात तर एकाच परिवारातील अनेक हातगाडे व टपऱ्यात थाटूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करते. टपऱ्यामुळे तालुका खरेदी विक्री संघाच्या इमारतीच्या बांधकामासाठी सुद्धा अतिक्रमणांचा मोठा अडसर ठरत आहे.
मुख्य बाजारपेठेत अजंठा चौकात ग्राहकांना पायी चालत सुद्धा लवकर जाता येत नाही. कोणताही सण उत्सव असला की व्यापाराच्या दृष्टीने सर्वाधिक वर्दळ असलेला अजंठा चौक हातगाडे, फेरीवाल्यांनी गजबजून रस्ता बंद होतो. दरम्यान, अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेची चाहूल विक्रेत्यांना लागल्याने त्यांनी पर्यायी जागा शोधण्याचा प्रारंभ केला आहे. दैनंदिन सर्व बाजार बाजारतळावर हलवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.
...अन्यथा जप्तीची कारवाई
सर्व विभागांच्या संयुक्त सहभागातून शहर हद्दीतील महामार्ग व राजमार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी विशेष मोही सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात रस्ता वाहतूक योग्य करण्यावर भर असेल. त्यानंतर पुन्हा अतिक्रमणे झाल्यास कारवाईची मोही हटाती घेतली जाईल. दैनंदिन फिरते पथकही तैनात असेल. व्यापाऱ्यांनीही दुकानाबाहेर टांगलेला माल हटवून दुकानाच्या आत मांडणी करावी. अन्यथा जप्तीची कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.