आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:पाथर्डीत पवार यांचा निषेध

पाथर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अजित पवार मुर्दाबाद, स्वराज्यरक्षक धर्मविर संभाजी महाराज की जय.. राजे संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अजित पवारांचे करायेच काय, खाली डोके वर पाय. अशी जोरदार घोषणाबाजी करत पाथर्डीमध्ये भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने अजित पवारांचा निषेध करुन तहसिलदार शाम वाडकर यांना लेखी निवेदन देण्यात आले.

निवेदन आमदार मोनिका राजळे व भाजपाचे प्रदेश सचिव मनोज पांगरकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. तहसिल कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी गोकुळ दौंड, शुभम गाडे, नंदकुमार शेळके, अमोल गर्जे, सुनिल ओव्हळ, डॉ. मृत्युजंय गर्जे, काकासाहेब शिंदे, अनिल बोरुडे, जगदिश काळे, जमीर आतार, महेश बोरुडे, विष्णुपंत अकोलकर, अजय भंडारी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...