आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:पोटच्या अल्पवयीन मुलीवर पित्यानेच केला अत्याचार

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोटच्या अल्पवयीन मुलीवर (वय १४) तिच्या पित्यानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासंदर्भात पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नराधम पित्याविरूध्द येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पित्याने १५ एप्रिल रोजी दुपारी पुणे येथे अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

त्यानंतर १२ जून रोजी सायंकाळी मामाच्या गावी सोडण्यासाठी घेऊन जात असताना कोल्हार घाट बहीरवाडी शिवार (ता. नगर) येथील जंगलात तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आई व बहिणीला सांगितल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या आईने मानसिक आधार दिल्यावर तिने गुरूवारी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...