आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक विमा:पीक विमा योजनेतील त्रुटीकडे पवारांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष

कर्जत / जामखेड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या वर्षी राज्यात सर्वदूर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांचा खर्च देखील निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पिक विमा योजनेत दावे निकाली काढताना विमा कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

राज्यात अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने विमा कंपन्यांनी नफेखोरी न करता लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलेल्या मुदतीत नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.

परंतु सर्वेक्षण पूर्ण झाले असूनही विमा कंपन्या दावे निकाली काढायला उशीर लावत असून नफेखोरीसाठी अनेक शेतकऱ्यांचे दावे देखील फेटाळले जात असल्याची स्थिती सध्या दिसून येत आहे. अशातच पिक विमा कंपन्यांकडून अनेक तांत्रिक कारणे देखील सांगितली जात आहेत. नगर जिल्ह्यात पिक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी भरलेला हप्ता व सरकारने भरलेला वाटा असे एकूण सुमारे ८१ कोटी रुपये जमा केले असताना देखील विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ ९ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.

अशी गंभीर परिस्थिती व शेतकऱ्यांना होत असलेला त्रास ओळखून आमदार पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन शासनाने याकडे लक्ष देऊन पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले.

बातम्या आणखी आहेत...