आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोले तालुका राष्ट्रीय काँग्रेसची मागणी:शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या; राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा

अकोलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यासह अकोले तालुक्यातील सर्वदूर भागातून परतीच्या पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणाहून ढगफुटीसदृश पावसाने प्रचंड नुकसानी केल्या. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मंगळवारी घेण्यात आलेल्या अकोले तालुका काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आली.

अकोले तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमेटीची बैठक अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहावर तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर केंद्रीय व राज्य पातळीवरील काँग्रेस पक्षाकडून घेतलेल्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला.

गुरुवारी अकोले तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देत या आंदोलनात राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती अकोले तालुका काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले, तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, जिल्हा उपाध्यक्ष व सोशल नेटवर्किंगचे जिल्हाध्यक्ष शिवाजी नेहे व अगस्ती साखर कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे यांनी दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची महाराष्ट्रात भारत जोडो पदयात्रा येणार असून या पदयात्रेत अकोल्यातून शेकडो कार्यकर्ते जाण्याचे नियोजन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...