आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसपींची अधिसूचना जारी:उड्डाणपुलावर पादचारी; फेरीवाल्यांना प्रवेश बंद

नगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बहुचर्चित उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून पुलावर पादचारी, हातगाडी, फेरीवाले, ठेलेवाले त्यांच्या हातगाड्या उभ्या करून, उड्डाणपुलावरून हातगाडीसह प्रवास करून वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहे. काहींनी या पुलावरून जनावरेही नेली. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी उड्डाणपुलावर पादचारी, हातगाडी विक्रेते, फेरीवाले व जनावरांना प्रवेश बंद केला आहे.

गुरुवारी यासंदर्भात अधिसूचना जरी करण्यात आली. शुक्रवारपासून (२५ नोव्हेंबर) याची अंमलबजावणी करण्याचे आदेश अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत. १९ नोव्हेंबर रोजी उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. हा पूल सार्वजनिक वाहतुकीकरीता खुला करण्यात आलेला आहे. शहरातील हा पहिलाच उड्डाणपूल असल्याने अनेक नागरिक तो पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यातच उड्डाणपुलावरून पादचारी, हातगाडी, फेरीवाले, ठेलेवाले त्यांच्या हातगाड्या उभ्या करून व्यावसाय करत असल्याचे आढळून आले आहे. काही व्यक्ती जनावरे घेऊन जात आहेत.

काही उत्साही पादचारी हे उड्डाणपुलावर थांबून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याचे समोर आले आहे. यातून भविष्यात एखादा गंभीर अपघात होऊन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत पोलिस अधीक्षक ओला यांनी प्रवेश बंदीची अधिसूचना जारी केली. त्यानुसार आता उड्डाणपुलावर पादचारी, हातगाडी, फेरीवाले, ठेलेवाले व जनावरे यांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दरम्यान, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने पोलिस प्रशासनाकडून कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...