आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:पेन्शन धारक देशव्यापी आंदोलनात सहभागी होणार

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईपीएस पेन्शन धारकांच्या मागण्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत चर्चा करुन संघटनेची भविष्यात दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली.

७ व ८ डिसेंबर रोजी दिल्लीला देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली असून, या आंदोलनात पूर्ण ताकतीने उतरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीस अध्यक्ष एस. एल. दहिफळे, सुभाष कुलकर्णी, बाबूराव दळवी, एमएसईबी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. गोकुळ बिडवे, भाऊसाहेब पावसे, कुलकर्णी, उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...