आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनी शिंगणापूरचा चौथरा भाविकांसाठी खुला:महिलांनाही तेल अभिषेक करण्यास पुन्हा परवानगी; विश्वस्तांच्या बैठकीत निर्णय

अहमदनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील लाखों भाविकांसाठी एक आनंदाची बातमी. श्री क्षेत्र शनिी शिंगणापूर येथील चौथरा आता भाविकांना खुला करण्यात आला आहे. विश्वस्तांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे तेल अभिषेकासाठी महिलांनाही पुन्हा एकदा चौथऱ्यावर प्रवेश देण्यात येत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. यापूर्वी पुरुष आणि स्त्री भाविकांना चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करता येत होता. मात्र, काही वर्षे या ठिकाणी महिलांना प्रवेश बंद होता. त्यामुळे तो प्रवेश सुरू करण्यासाठी 2014 मध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी केवळ पादुकापर्यंत भाविकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. आता शनिवारपासून शनिशिंगणापूरमध्ये चौथऱ्यावर जाऊन भाविकांनी तेल अभिषेक करण्यास सुरुवात केली आहे. विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

प्रवेशाचा वाद काय?

शनी शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश बंदी होती. मात्र, 28 नोव्हेंबर 2015 रोजी एका महिलेने हा नियम मोडला. चौथऱ्यावर जात अभिषेक केला. जवळपास चारशे वर्षांच्या परंपरेला तिने चूड लावल्याचे बोलले गेले. या प्रकरणी सात सुरक्षारक्षकांवर निलंबनाची कारवाई केली. मात्र, अनेकांनी या महिलेचेही स्वागत करत ही नवी क्रांती असल्याचे म्हटले. मात्र, ग्रामस्थांनी दुग्धाभिषेक आणि मूर्ती शुद्धतेचा घाट घातला.

अभिषेकासाठी 500 ची देणगी

विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बानकर म्हणाले की, विश्वस्तांनी घेतलेल्या निर्णयानुसार शनिवारपासून भाविकांनी चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्यास सुरुवात केली. चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्यासाठी भाविकांना श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टची देणगी पावती घ्यावी लागेल. तेल अभिषेकासाठी महिला व पुरुष भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...