आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Petrol And Disel Scarcity At Ahemednagar | The Possibility Of A Shortage Of Diesel; Information Of District President Of Petrol Diesel Association Pawar

डिझेलच्या पुरवठ्यात 30 टक्‍क्‍यांनी घट:ऐन खरिपाच्या तोंडावर इंधन टंचाईची शक्यता; केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करणार

अहमदनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या आठ दिवसांपासून डिझेलच्या पुरवठ्यात तीस टक्क्यांची घट झाली आहे. हीच स्थिती राहिल्यास आगामी तीन ते चार दिवसांत सर्वत्रच डिझेलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत असोसिएशनची तातडीची बैठक झाली असून, या बैठकीत केंद्र सरकारला पत्र लिहून शंभर टक्के डिझेलचा पुरवठा करावा, अशी मागणी करणार असल्याची माहिती पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष चारुदत्त पवार यांनी सोमवारी दिली. दरम्यान अहमदनगर शहरातील नगर-औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर सोमवारी सकाळी डिझेल नसल्याचा फलक दिसून येत आला.

पंधरा दिवसांपासून कमतरता

पंधरा दिवसांपूर्वी डिझेल पुरवठा करणाऱ्या डेपोतून 10 ते 20 टक्के कमी प्रमाणात पुरवले जात होते. गेल्या आठवड्यात मागणीच्या तुलनेत तीनही डेपोतून 30 टक्के कमीच डिझेल पुरवठा केला गेला. 20 ते 25 रुपये दराने डिझेल विक्री केली जाते. ते आम्हाला परवडत नाही असे कारण डेपो चालकांनी सांगितले आहे. अहमदनगर जिल्ह्यात 350 पेट्रोल पंप आहेत. कमी प्रमाणात डिझेल पुरवठा होत असल्यामुळे त्याचा परिणाम पेट्रोल पंपावर देखील झाला असून अनेक ठिकाणी डिझेल नसल्याचे फलक झळकत आहेत.

पुढे काय होणार?

मध्यप्रदेश पेट्रोल डिझेल असोसिएशनने मध्य प्रदेशाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून डिझेलच्या कमी पुरवठयाबाबत तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचा डिझेल पुरवठा कमी केला जात आहे. त्याचा परिणाम शेती व्यवसायावर होणार असून सध्या शेतीत खरिपाची कामे सुरू आहेत. खरिपाच्या कामासाठी ट्रॅक्टर मध्ये डिझेलची लागते. कमी प्रमाणात त्याचा पुरवठा केला जात असल्यामुळे पेट्रोल - डिझेल असोसिएशनची तातडीची बैठक घेऊन आम्ही यात चर्चा केली. लवकरच याबाबत आम्ही केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करणार आहोत, असे चारुदत्त पवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...