आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर:प्रा.अर्चना दाते यांना पीएचडी

नगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट संचलित परिक्रमा शैक्षणिक संकुलातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापिका अर्चना राजेश दाते यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथून इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग विषयात पीएचडी मिळवली. “डेव्हलपमेंट अँड ऍनॅलिसिस ऑफ अल्गोरिदम फोर मुविंग ऑब्जेक्ट डिटेक्शन अंडर डायनामिक बॅकग्राऊंड” हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. त्यांना डॉ. संजीवनी शहा यांचे मार्गदर्शन मिळाले.

आमदार बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ प्रतिभा पाचपुते, सचिव विक्रम पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह पाचपुते, संकुल संचालक प्राचार्य डॉ. विजय पाटील, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा. अनिल पुंड यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. अर्चना दाते या मूळ कासारे तालुका पारनेर येथील डॉक्टर राजेश दाते यांच्या पत्नी होत.

बातम्या आणखी आहेत...