आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या आपत्तीत जीव गमावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना ५० हजारांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती विभागात हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेक मृतांच्या नातेवाईकांचे बँक खाते क्रमांक शून्यापासून सुरु होत असल्यामुळे ऑनलाइन मदत मिळण्यास विलंब लागत आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बहुतांशी बँक खाते हे जिल्हा बँकेतील आहेत. जिल्हा बँकेचा खाते क्रमांक शून्यापासून सुरु होतो.त्यामुळे अनेकदा ऑनलाइन अर्ज आपत्ती विभागाला सादर केल्यानंतर तो नाकारला जातो.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याच मृतांच्या नातेवाईकांना या मदतीसाठी चकरा माराव्या लागत आहेत. शून्यापासून बँक खाते असलेल्या मृतांच्या नातेवाईकांना दररोज आपत्ती विभागात मदत जमा झाली की नाही यासाठी फोन करावा लागतो तर अनेक जण प्रत्यक्षात आपत्ती विभागात येऊन मदतीबाबत विचारणा करतात. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती विभागात दररोज १५० फोन व प्रत्यक्षात ५० जण येऊन मदतीबाबत विचारणा करतात. मात्र आपत्ती विभागातून ज्या नातेवाईकाची मदत जमा झाली ती ऑनलाइन पाहून जमा झाली किंवा नाही हे सांगितले जाते.
मदतीबाबत ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ती सर्व प्रक्रिया राज्य पातळीवर होते. स्थानिक आपत्ती विभागाला केवळ किती नातेवाइकांचे मदत जमा झाली याची माहिती कळते.
राज्य आपत्ती विभागाला बँक खात्यासंबंधित तक्रारींची माहिती दिली ^ करुणा मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात ५० हजारांची मदत जमा केली जाते. हे सर्व काम मुंबईत राज्य आपत्ती विभागामार्फत केले जाते. आमच्याकडे फक्त किती मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मदत दिली याचा अहवाल असतो. शून्य क्रमांकावरून ज्या नातेवाईकांचे बँक खाते सुरू होते त्यांना मदत मिळण्यास अडचणी येतात. याबाबत राज्य आपत्ती आपत्ती विभागाला आम्ही माहिती दिली आहे.'' डॉ.वीरेंद्र बडधे, प्रमुख,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण.
संकेतस्थळावरच क्रमांक शून्य स्वीकारला जात नाही कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मदतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ज्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा लागतो त्यात संकेतस्थळावरच बँक खाते क्रमांक शून्य स्वीकारला जाणार नाही, अशी ओळ येते. त्यामुळे नातेवाईकांना दुसऱ्या बँकेत नवीन खाते उघडावे लागते या देखील बराच वेळ लागतो.
११ हजार ३१७ मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० हजारांची मदत नगर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ११ हजार ३१७ मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० हजार रुपये आतापर्यंत राज्य सरकारने मंजूर केले आहेत. नगर शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून १६ हजार ५१५ अर्ज कोरोना मृतांच्या नातेवाईकांचे आले होते. त्यापैकी ११ हजार ३६५ अर्जांना शासनाने मंजुरी दिली आहे. ११ हजार ३१७ मृतांच्या नातेवाईकांना सरकारने मदत मंजूर केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.