आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:निरामय आरोग्यासाठी फिजिओथेरपी उपचार चांगला उपाय ; आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बरेचसे असे आजार आहेत, जे औषधाविना व शस्त्रक्रिया शिवाय व्यायामाद्वारेसुद्धा बरे होऊ शकतात. त्यासाठी फिजिओथेरपी ही सोपी व आधुनिक उपचारपद्धत खूप फायदेशीर आहे. उत्तम आरोग्यासाठी फिजिओथेरपी उपचार आवश्यक आहेत. नागरिकांनी या उपचाराकडे वळावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी केले.जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात रोटरी मिडटाउन क्लबच्या सहकार्याने मोफत हाडांच्या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. घोगरे बोलत होते. कार्याक्रमास रोटरी मिडटाऊन क्लबचे अध्यक्ष सतीश शिंगटे, सचिव तुषार देशमुख, प्रमुख पाहुण्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन हॉस्पिटलच्या फिजिओथेरपिस्ट डॉ. सुवर्णा गणवीर उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जमदाडे, क्लबच्या माजी सचिव कल्पना गांधी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम पानसंबळ, डॉ. घुगे, डॉ. देवडे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे स्वतःच्या हाडांची तपासणी करून या शिबिराचे उद्घाटन केले. या शिबिरात सुमारे ४८० नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. सतीश शिंगटे म्हणाले, वेगवेगळ्या औषधांचा वापर केल्याने शरीरावर विपरीत परिणाम होताना आपण पाहत आहोत. फिजिओथेरपी उपचाराने औषधा शिवाय व शस्त्रक्रिया शिवाय व्यायामाद्वारे उपचार करून सहज व्याधी दूर केल्या जातात. यासाठी सर्वांनी नियमित फिजिओथेरपी घ्यावी. फिजिओथेरपी उपचाराबबत जनजागृती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रोटरी मिडटाऊन क्लबच्या वतीने सिव्हील हॉस्पिटलमध्ये अनेक उपक्रम राबवले आहेत.

क्लबच्या वतीने अन्नपूर्णा योजना येथे राबवून ५ वर्ष येथील रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत भोजन दिले जात होते. यावेळी डॉ. विक्रम पानसंबळ यांनी रोटरी मिडटाउन क्लबच्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमृता गवळी यांनी केले. तर डॉ. शर्वरी वाघमारे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले.

धावपळीच्या युगात मानव यंत्रासारखा काम करतोय..
आजच्या धावपळीच्या युगामध्ये मानव हा एका यंत्राप्रमाणे काम करत आहे. मानवाच्या शरीरावर त्याचे अनेक दुष्परिणाम झाले आहेत. त्यामूळे अनेक वेगवेगळ्या व्याधी आणि आजार उद्भवत आहेत. कामाचा ताण तणाव बदलती जीवनशैली पाहता रोज नवीन नवीन आजार निर्माण होत आहेत. या आजारांवर मात करण्यासाठी नवीन नवीन संशोधन केले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...