आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री साईबाबांचे शिष्य श्री क्षेत्र साकुरी येथील उपासनी महाराजांचा पिंजरा शताब्दी जयंतीउत्सव साजरा करण्यात आला. या कालावधीत सती गोदावरी माताजी कृत उपासनी महाराज नामावली, हवन, महाअभिषेक, गीतापठण तसेच गायन वादन, प्रवचने आदि कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शनिवारी सकाळी श्रींचे व पिंजरा पूजन करण्यात आले.
जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शालिनी विखे यांच्या हस्ते ऊपासनी महाराज बोधवचने असलेल्या सिध्दांत रत्नमाला पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी माधवीताई गुरु गोदावरी, व्यवस्थापक पंकज शहा, डॉ. शुभांगी कुलकर्णी, निता राशिनकर, डॉ. संजिवनी आंबेकर आदी उपस्थित होते. शालिनी विखे म्हणाल्या, जीवनात सद्गुरुंचा सहवास सर्वांसाठी महत्वाचा आहे. ऊपासनी महाराज स्थानामध्ये आल्यानंतर एक वेगळीच अनुभूती मिळते.
यावेळी जि. प. सदस्या पुष्पा रोहम, अनंतशास्त्री लावर, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष सतीश बावके, विठ्ठल शिंदे, आशिष दंडवते, संदीप दंडवते, उपसरपंच सचिन बनसोडे,बाळासाहेब रोहोम, नाडकर्णी, पद्माकर जोशी, विजय कुलकर्णी, मिलिंद जकाते, मेघना दंडवते, श्रद्धा दंडवते, भक्तगण व ग्रामस्थ उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.