आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा:जिल्ह्यातील 607 गावांचा आराखडा तयार, स्वच्छतेच्या कामास गती देणार

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन अंतर्गत हागणदारी मुक्त कामगिरीत सातत्य ठेवणे तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी जिल्ह्यात सुमारे 607 गावांतील कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जागतिक शौचालय दिनानिमित्त 3 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत कामांना गती देण्यासाठी विशेष मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी हाती घेतली आहे.

१९ नोव्हेंबर जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत जिल्हयातील सर्व गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी तसेच वैयक्तिक शौचालयाचा वापर होणे, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२२-२३ अंतर्गत विहित कालमर्यादेत कार्यवाही करणे यासाठी ३ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

जिल्हयातील स्वच्छतेच्या कामास गती देऊन स्वच्छतेचा जागर करण्यात येणार आहे. जागतिक शौचालय दिनानिमित्त, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत गावस्तरावर स्वच्छतेच्या विविध उद्दिष्ठांच्या पूर्तीकरिता सूक्ष्म नियोजन करुन कामे पूर्ण केली जाणार आहेत.

या मोहीम कालावधीत यापूर्वी मंजूर केलेले वैयक्तिक, सार्वजनिक शौचालय संकुलाची कामे पूर्ण करण्यावर भर असणार आहे. विशेष स्वच्छता मोहीम कालावधीत ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेऊन सार्वजानिक ठिकाणची स्वच्छता तसेच एक शोषखड्डे असलेली शौचालय दोन शोषखड्डे शौचालयात रुपांतर केली जाणार आहे. याबाबत सर्व अधिकारी,कर्मचारी यांना नियोजपूर्वक कामे करुन मोहीम राबवण्याच्या सूचना अहमदनगर जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छ्ता उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी दिली.

या कामांना मिळणार गती

बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, गोबरधन प्रकल्प, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प, शोषखड्डे बांधकाम, नादुरुस्त शौचालय दुरूस्ती करणे, मैला गाळ व्यवस्थापन अशा प्रकारे सुरू असणारी ही सर्व कामे पुर्ण केली जाणार असल्याची माहिती आशिष येरेकर यांनी दिली.

७६९ कामांचा प्रस्तावित आराखडा

जिल्ह्यात घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन तसेच वैयक्तिक शौचालयांच्या सुमारे 769 गावातील कामांचा आराखडा प्रस्तावित आहे. त्यापैकी 607 कामांचे आराखडे तयार असून सुमारे 590 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. - सुरेश शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...