आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाईसाठी मनपाकडून नियोजन

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांवर तसेच रस्त्यालगतच्या इमारतींमध्ये घर व गाळ्यासमोर शेड मारून करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाईसाठी महापालिकेकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. प्रमुख रस्त्यांवर मोजणी करून मार्किंग करण्याचे आदेश प्रभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत चारही प्रभाग समिती कार्यालयांसाठी चार स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. पथारी व्यावसायिक, हातगाडी विक्रत्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा होतो. तसेच अनेक ठिकाणी इमारतीमधील गाळ्यांसमोर पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याचाही परिणाम वाहतुकीवर होऊन नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी होतात. अस्तित्वातील रस्त्यावरही विनापरवाना बांधकाम झाल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. जावळे यांनी सोमवारी नगररचना व अतिक्रमण निर्मूलन विभागाची बैठक घेऊन कारवाईचे नियोजन करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभाग व नगररचना विभागाने प्रभाग समिती कार्यालयांना मार्किंग करून अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयांच्या हद्दीत स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यांना तत्काळ मोजणी व मार्किंग करण्याचे आदेश विभाग प्रमुख रोहिदास सातपुते यांनी दिले आहेत.

चायना मांजावर कारवाईचे आदेश
शहरात चायना मांजाचा वापर सर्रास सुरु झाला आहे. मकरसंक्रांतीला महिनाभराचा अवधी असला तरी अनेक दुकानांमध्ये चायना मांजाची आत्तापासूनच विक्री सुरु झाली आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्यापूर्वीच कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...