आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आळंदी यात्रेसाठी प्रवाशांची गर्दी:एसटीने केले जादा गाड्यांचे नियोजन; परिवहन मंडळाने तात्पुरते वाढवले भाडे

अहमदनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा तसेच कार्तीकी एकादशीनिमित्त आळंदी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या पाश्वभूमीवर एसटी महामंडळाच्या नगर विभागाच्यावतीने सर्वच तालुक्यातून जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. नगर शहरातील बसस्थानकात शनिवारी पुणे जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळाली.

परिवहन मंडळाने तात्पुरती वाढवले भाडेवाड

रविवारी (20 नोव्हेंबर) तर मंगळवारी (22 नोव्हेंबर) माऊली समाधी सोहळा पार पडणार आहे. यात्रेनिमित्त राज्यभरातील भाविक गुरूवारपासूनच आळंदी दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. राज्य परिवहन मंडळाने भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी 18 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे दिवाळीप्रमाणे तात्पुरती भाडेवाड केली नाही.

भाविकांची गर्दी

एसटीच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यात नगर, संगमनेर, श्रीगोंदे, पारनेर या ठिकाणाहून आगारस्तरावर जादा वाहतूक करावी. तारकपूर, शेवगाव, जामखेड श्रीगोंदे, पाथर्डी, पारनेर व नेवासे आगारांनी शिरूर शिक्रापूर मार्गे जऊन वडगाव घेनंद (आळंदी यात्रा केंद्र) येथून प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार जादा वाहतूक करावी. संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव व नेवासे आगारांनी संगमनेर आळेफाटा मार्गे जाऊन चाकण येथून जादा वाहतूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जादा वाहतुकीचे नियोजन असतानाही, अपेक्षापेक्षाही अधिक गर्दी झाल्याचे चित्र नगरच्या बसस्थानकात शनिवारी दिसून आले.

जागा मिळण्यासाठी प्रवाशांची धडपड

एसटीत जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू असल्याचे चित्र दिवसभर होते. बसच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी झाल्यानंतर अनेक प्रवासी खिडक्यांमधून बसमध्ये प्रवेश करतानाचे चित्र होते. एसटीच्या खिडक्यांमधून धोकादायक पद्धतीने बसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सुरू असलेली धडपड बसची वाट पाहून कंटाळलेल्या प्रवाशांमध्ये दिसून आली.

परतीच्या नियोजनासाठी 386 फेऱ्या होतील

विभागनियंत्रक मनिषा सपकाळ तसेच वाहतूक अधिकारी अविनाश कल्हापुरे तसेच सर्व आगार व्यवस्थापकांनी जादा वाहतुकीचे 22 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत परतीचेही नियोजन केले. यात्रा कालावधीत 386 फेऱ्या होणार आहेत, यासाठी सुमारे 72 बसगाड्यांचा वापर केला जाणार आहे. नगर ते आळंदी पूर्ण प्रवासभाडे 175 रूपये तर अर्धे प्रवासीभाडे 90 रूपये आहे.

बातम्या आणखी आहेत...