आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक समस्या:शहरात नव्या दोन उड्डाणपुलाचा आराखडा गडकरींना पाठवला; शहर काँग्रेसचे किरण काळे यांची पत्रकार परिषदेत माहिती

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरात निर्माण झालेली वाहतूक समस्या सोडवण्यासाठी दोन उड्डाणपुलांची गरज आहे. या दोन्ही उड्डाणपुलांचा आराखडा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवून केली, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.काळे म्हणाले, शहरातील वाहतूक समस्या पाहता आणि शहरातील स्थानिक नागरिकांची गरज लक्षात घेता सक्कर चौक ते अशोका हॉटेल या उड्डाणपुलाला १.० असे संबोधले आहे. हा उड्डाणपूल विक्रमी वेळेत पूर्ण केला तेवढ्याच विक्रमी वेगात २०२४ पूर्वीच आणखी दोन उड्डाणपूल उभारावेत.

उड्डाणपूल २.० हा सुमारे न्यू आर्ट्स कॉलेज ते सक्कर चौक असा करण्याची आमची मागणी आहे. हा उड्डाणपूल आताच्या सक्कर चौक ते अशोका हॉटेल पर्यंतच्या उड्डाणपुलाला जोडण्यात यावा. दुसऱ्या बाजूला नगर कल्याण रोडवर सीना नदीच्या पलीकडे शिवाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये नगर शहराचा नव्याने विस्तार झाला आहे. त्यामुळे जाधव पेट्रोल पंप ते नेप्ती नाका चौकापर्यंत उड्डाणपूल ३.० करावा अशी, आमची मागणी आहे. तो करत असताना जुन्या नदी पुलाचीही उंची वाढवणे आवश्यक आहे, प्रस्ताव मंजूर करण्याबाबत खासदार डॉ. सुजय विखे यांनी लक्ष घालावे, असेही काळे यांनी सांगितले.

श्रेयवादात पडायचे नाही
ज्याने जे केले आहे, त्याला त्याचे श्रेय मिळाले पाहिजे. स्व. अनिल राठोड यांना पहिल्या उड्डाणपुलासाठी केलेल्या पाठपुराव्यासाठीचे श्रेय द्यायला हवे होते. पण कोणाला श्रेय घ्यायचे त्यांनी ते घ्यावे. श्रेय वादात मला पडायचे नाही, असा टोला काळे यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...