आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:वृक्षारोपण एक सामाजिक बांधिलकी; आमदार मोनिका राजळे यांचे प्रतिपादन

करंजीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामाजिक बांधिलकी असून प्रत्येकाने दरवर्षी वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्व.माजी आमदार राजीव राजळे मित्र मंडळ कासार पिंपळगाव यांच्या वतीने मांडवे येथील आनंदवन येथे राजीव राजळे स्मृतिवृक्ष उद्यानचे उद््घाटन आमदार राजळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. यावेळी आमदार राजळे म्हणाल्या, संदीप राठोड यांनी देखील मांडवे सारख्या छोट्याशा गावात आनंद वनाची स्थापना करून या परिसरात लावलेली हजारो झाडे लावली. यावेळी आनंदवनचे व्यवस्थापक वृक्षप्रेमी प्राथमिक शिक्षक संदीप राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघूलकर, शिक्षक नेते कल्याण लवांडे, अंकुश राजळे, सुधीर शेळके, प्रवीण तुपे, रंगनाथ चितळे, रमेश भुसारी, मिनीनाथ शिंदे, होळकर, वांढेकर, सरपंच राजेंद्र लवांडे, उपसरपंच गणेश शिंदे, रमेश लवांडे, अनंत राजळे, अप्पा राजळे, अमित भगत, अजय राजळे, रामेश्वर राजळे, बाळासाहेब म्हस्के, भागवत खरड, संदीप वैद्य आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...