आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवग्याची लागवड:जिल्ह्यात अंगणवाडी परिसरात 14 हजार शेवग्याची लागवड

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अमृत पंधरवाड्यांतर्गत विभाग प्रमुखांना उद्दिष्ट दिले होते. या उद्दिष्ठांचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील साडेसात हजार ऊस तोड मजुरांना ओळखपत्र देण्यात आली, तसेच अंगणवाडीच्या आवारात १४ हजार शेवग्याची झाडे लावल्याची माहिती जिल्हा परिषदेने दिली.

ऊसतोड कामगार नोंदणी करून ओळखपत्र वाटप करण्यात आले, नरेगा अंतर्गत ४५० शाळा व अंगणवाड्यांना जैविकग कंपाउंड देण्यात आले आहे. तसेच एकाच दिवशी, एकाच वेळी ७५ हजार वृक्षलागवड करण्यात आली. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणविभागांतर्गत ७ हजार २१६ एकल विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. ५० पेक्षा जास्त गावांत हर घर, जल योजनेचा लाभ देऊन १०० पेक्षा जास्त गावे ओडिएफ प्लस करण्यात आली आहेत.

५ गडाक ६३४ अंगणवाड्यांचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात आले. त्यानुसार अ श्रेणीत २६३, ब १३२५, क १७३७ व ड श्रेणीत २ हजार ३०९ अंगणवाड्यांची नोंद घेण्यात आली आहे. अभिलेख वर्गीकरण मोहिमेंतर्गत साडेचार हजार फाईलींचे वर्गीकरण करून अभिलेखात पाठवण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यकता नसलेल्या ६८२ फाईल नष्ट करण्याचे काम सुरू झाले आहे. शुन्य ते सहा वयोगटातील बालकांच्या कुपोषणाबाबत सॅम गटातील २९८ तर मॅम श्रेणीतील २ हजार २२२ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अमृत पंधरवाड्यांतर्गत ६० वर्षावरील १०० टक्के नागरिकांना बुस्टर डोस देण्याचे सीईओ येरेकर यांचे आदेश होते. त्यानुसार आरोग्य विभागाने जिल्हाभरातील सुमारे ११ हजार ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस दिले आहे.

90 शाळांत रेनवाॅटर हार्वेस्टिंग
जिल्ह्यातील शाळांमध्ये रेनवाॅटर हार्वेस्टिंग उभारण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ९० शाळांमध्ये रेन वाॅटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. तसेच नवोदयसाठी तिसरी व चाैतीच्या वर्गांसाठी पुस्तके तयार करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...