आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:वटपौर्णिमेनिमित्त 134 गावांमध्ये वटवृक्षांचे वृक्षारोपण ; महिलांनी वृक्षसंवर्धन चळवळीत टाकलेले हे पाऊल प्रेरणादायी

सोनई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व शारदाताई फाऊंडेशनच्या वतीने नेवासे तालुक्यातील १३४ गावांत व आदर्शगाव मोरयाचिंचोरे येथे माजी सभापती सुनीता गडाख यांच्या उपस्थितीत १०० वटवृक्षांचे महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षरोपणासाठी या १३४ गावांत ४ ते ५ फूट उंचीचे वटवृक्ष उपलब्ध करून देण्यात आले होते. नेवासे तालुक्यातील बेलपिंपळगाव, सोनई ,चांदा,कुकाणे, देडगाव, पाचेगाव, शिरसगाव, भानसहिवरा, जेऊर हैबती, पानेगाव, नेवासे, प्रवरासंगम या गावासह सर्व १३४ गावांत सकाळी ८ ते दुपारी १२ या कालावधीत वृक्षारोपण करण्यात आले. आदर्शगाव मोरयाचिंचोरे येथे एकाच वेळी १०० वटवृक्षांचे १०० महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सुनीता गडाख म्हणाल्या, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व शारदाताई फाउंडेशन यांच्या वतीने गावा गावांत महिलांच्या हस्ते वटवृक्षांचे रोपण होत आहे ही अभिनंदनीय बाब आहे. महिला भगिनींच्या सहकार्याने आपण यापुढेही वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्नशील राहू. गावा गावात वृक्षारोपन करण्यात आलेल्या वटवृक्षांचे सर्व मिळून संगोपन करू व नेवासे तालुक्यातील महिलांनी वृक्षसंवर्धन चळवळीत टाकलेले पाऊल सर्वांना प्रेरणादायी ठरेल, असा आशावाद याप्रसंगी व्यक्त केला. याप्रसंगी उषा गडाख, प्रा. जयश्री गडाख, पंचायत समिती सदस्य मीनाक्षी सोनवणे, सरपंच जयश्री मंचरे आदी उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...