आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:कर्जतमध्ये बसफेऱ्यांत कपात झाल्याने प्रवाशांचे हाल

कर्जतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी प्रशासनाच्या बस कपातीचा सर्व सामान्य प्रवाशांना फटका बसत असून तासंतास बसची वाट पाहत ताटकळत बसावे लागते आहे. कर्जत तालुक्यात एसटी बस आणि आगाराचे शुक्लकाष्ठ गेल्या ४२ वर्षांनी आजही संपले दिसत नाही. आजही कर्जतला भोवतालच्या एसटी आगारावर अवलंबून राहावे लागते. श्रीगोंदे, जामखेड, करमाळा, अहमदनगर आणि बारामती या आगारांच्या मेहेरबानीवर कर्जत बसस्थानक चालते. कधीकधी त्यांच्या सापत्न वागणुकीचा फटकाही सामान्य प्रवाशांसह विद्यार्थ्यांना बसत आहे.

कर्जत बसस्थानक हे श्रीगोंदे आगारांच्या अंकित येत असल्याने म्हणजे कर्जत येथे आगार नसल्याने त्याचे नियंत्रण श्रीगोंदे आगारांच्या अंतर्गत येत असल्याने सध्या ऐन दिवाळीच्या काळात श्रीगोंदे आगाराने बस कपातीचे धोरण स्वीकारले. त्यामुळे कर्जत येथील प्रवाशांना त्यांचा प्रचंड मनस्ताप होत आहे. मोठे उत्पन्न देणाऱ्या बस देखील रद्द होताना दिसतात. जुन्या जीर्ण तसेच नादुरुस्त बस कर्जतला पाठवून प्रवाशांच्या जिवाशी देखील खेळण्याचा प्रयत्न होताना दिसतो. त्यामुळे प्रवाशांना तासनतास ताटकाळत बसण्याची वेळ येत आहे.

एकूण २० बसेस कपात केल्याचे स्थानिक एसटी प्रशासनाकडून समजते. श्रीगोंदे आगराकडून मुक्कामी बसमध्ये ऐनवेळी फेरबदल करणे तसेच रद्द करणे याने फक्त प्रवाशांनाच नाहीतर स्थानिक कर्मचाऱ्यांनाही मनस्ताप होत आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी श्रीगोंदे आगारात अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत सूचना केल्या होत्या. यावर श्रीगोंदे आगाराने योग्य दखल घेण्याची गरज आहे. सध्या दिवाळी सुट्या आणि पंढरपूरसाठी जादा बस सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही बस त्या ठिकाणी पाठवण्याचे नियोजन असल्याने तीन दिवसांत काही बस पूर्ववत सुरू होतील, अशी माहिती श्रीगोंद्याचे आगारप्रमुख प्रशांत होले यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...