आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधाराची काठी:पीएम किसान सन्मान निधीमुळे ब‍ियाणे, खते, अवजारे खरेदीसाठी मदत; लाभार्थ्यांकडून आनंद व्यक्त

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान क‍िसान सन्मान न‍िधी योजनेच्या माध्यमातून म‍िळालेल्या शासकीय मदतीमुळे शेतीकामासाठी लागणारे अवजारे, ब‍ियाणे, खते अशा शेती उपयोगी वस्तूंची खरेदी करता आली. यामुळे शेती करणे ज‍िकीरीची न ठरता सुलभ झाले, या शब्दात पंतप्रधान क‍िसान सन्मान योजनेच्या राहाता तालुक्यातील लाभार्थ्यांनी भावना व्यक्त केल्या.

1 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान क‍िसान सन्मान न‍िधी योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेची अंमलबजावणी राज्य शासनाच्या शासकीय यंत्रणेमार्फत केली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर चार मह‍िन्यांनी 2 हजार असे वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थ‍िक मदत थेट व‍ितरित केली जाते. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना 31 मार्च 2019 रोजी थेट बँके (डीबीटी) च्या माध्यमातून पह‍िला हप्ता देण्यात आला. आतापर्यंत या योजनेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हप्ते जमा करण्यात आले. 11 वा हप्ता 31 मे 2022 रोजी व‍ितर‍ित करण्यात आला. पंतप्रधान क‍िसान सन्मान योजनेच्या माध्यमातून नगर ज‍िल्ह्यातील राहाता तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना 10 हप्त्यांच्या माध्यमातून प्रत्येकी 20 हजार रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली.

बियाणे खरेदीसाठी झाली मदत

या योजनेत म‍िळालेल्या मदतीव‍िषयी राजुरी येथील शेतकरी योगेश दामोदर गोरे यांनी सांग‍ितले की, मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. सध्या मी बीएसस्सीच्या पह‍िल्या वर्षात श‍िक्षण घेत आहे. श‍िक्षणासोबत शेती ही करतो. पीएम किसान योजनेमुळे माझ्या कुटुंबाला फायदा झाला. ऑनलाइन बियाणे खरेदी करतांना खात्‍यावर रक्‍कम शिल्‍लक नव्‍हती, नेमक्या त्‍यावेळी योजनेचा पहिला हप्‍ता प्राप्‍त झाल्‍याने ब‍ियाणे खरेदी करणे शक्‍य झाले.

शेतकऱ्यांना आधाराची काठी

बाभळेश्वर खुर्द येथील शेतकरी व‍िजयकुमार तान्हाजीराव बेंद्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, पंतप्रधान सन्मान न‍िधी योजना शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे आधाराची काठीच आहे. या माध्यमातून म‍िळणाऱ्या मदतीमुळे कौटुंब‍िक गरजांसाठी व वैद्यकीय खर्चासाठी उपयोग झाला. शासनाने ही योजना पुढेही न‍ियम‍ितपणे सुरू ठेवावी.

खरिपासाठी झाली मदत

बाभळेश्वर बुद्रुक येथील शेतकरी मीनानाथ भाऊसाहेब म्हस्के म्हणाले, पंतप्रधान सन्मान योजनेच्या माध्यमातून म‍िळालेला न‍िधीचा न‍िश्च‍ितच शेतकऱ्यांसाठी आधार ठरतो. मला ही या न‍िधीच्या माध्यमातून बी-ब‍ियाणे, खरिपातील फवारणीसाठी औषधे खरेदी व ट्रॅक्टरसाठी ड‍िझेल खरेदीसाठी मदत झाली.

बातम्या आणखी आहेत...