आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी मंजूर:कवी अनंत फंदी बंदिस्त नाट्यगृह कामासाठी 8 कोटीचा निधी मंजूर ; सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांचे आयोजन

संगमनेर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे कवी अनंत फंदी नाट्यगृह बंदिस्त करण्याच्या कामासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी दिली. यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांचे आयोजन होणार असल्याने नागरिकांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, मंत्री थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहराची विकासातून वैभवाकडे वाटचाल सुरू आहे. वैभवशाली इमारतीसह सुंदर व भव्यदिव्य हायटेक बस स्थानक उभे राहिले आहे. शहराला जोडणाऱ्या चारही रस्त्याचे चौपदरी व सुशोभीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. नाट्यगृहाला ८ कोटीचा भरीव निधी मिळाल्याने ते आता बंदीस्त होणार आहे. मंत्री थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शहर व तालुक्यासाठी सातत्याने मोठा निधी मिळवला. विकास कामातून संगमनेर राज्यात मॉडेल ठरले आहे. पालिकेने शहरवासीयांना चांगल्या सुविधांबरोबर स्वच्छता, निळवंडेच्या थेट पाईपलाईनमुळे मुबलक व स्वच्छ पाणी, गार्डन, रस्ते, आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...