आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगोंद्यात मानवी तस्करी जोरात:पोलिसांकडून चौघांची सुटका‎, बेलवंडी पोलिसांकडून परराज्यातील वेठबिगारांची मुक्तता, 5 हजारांत विक्री‎

श्रीगोंदे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाणे हद्दीत ‎ ‎ मानवी तस्करी आणि वेठबिगारीवर‎ बेलवंडी पोलिसांनी धडक कारवाई करीत‎ ४ जणांची सुटका केली. या कारवाईने ‎ ‎ वेठबिगारी करून घेणाऱ्यांचे धाबे चांगलेच ‎ ‎ दणाणले आहे.‎

ढवळगाव नजीक एका विहिरीतील‎ पाण्यावर दोन दिवसांपूर्वी एका अनोळखी ‎ ‎ दिव्यांग व्यक्तीचा मृतदेह आढळून आला‎ होता. या घटनेचा तपास करताना, बेलवंडी ‎ ‎ पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या गुप्त ‎ ‎ माहितीनुसार, बेलवंडी पोलिस स्टेशनचे ‎ ‎ निरीक्षक संजय ठेंगे यांनी पीएसआय राजेंद्र ‎ ‎ चाटे आणि पोलिस कर्मचाऱ्यांची स्वतंत्र‎ तीन पथके तयार करून बेलवंडी पोलीस‎ ठाणे हद्दीत वेठबिगारांची शोधमोहीम‎ घेतली.‎

खरातवाडी (ता. श्रीगोंदे) येथे पिलाजी‎ कैलास भोसले याच्या ताब्यातून सलमान‎ ऊर्फ करणकुमार (रा. छत्तीसगड) याची‎ सुटका केली. घोटवी शिवारात बोडखे‎ मळा येथे अमोल गिरीराज भोसले‎ याच्याकडून ललन सुखदेव चोपाल (रा.‎ ‎बिहार) याची सुटका केली. घोटवी‎ शिवारातील अशोक दाऊद भोसले आणि‎ जंग्या गफूर काळे यांच्या तावडीतून भाऊ‎ हरिभाऊ मोरे (रा. अंबेजोगाई, बीड) याची‎ सुटका केली.

या आरोपींना अटक‎ करण्यात आली. चौकशीत त्यांनी यापूर्वी‎ एका इसमास सुरोडी येथील मारुती‎ गबुललाल चव्हाण यास ५ हजारांत‎ विकल्याचे सांगितले. सुरोडी शिवारात जाऊन खात्री करून‎ शव श्रीश (रा. कर्नाटक) याची सुटका‎ करण्यात आली. या आरोपींविरोधात‎ बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे. पुढील तपास‎ बेलवंडी पोलिस करीत आहेत. पोलिस‎ अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय‎ पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव‎ यांच्या मागदर्शनाखाली पो.नि. संजय ठेंगे,‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ पो.स.ई. राजेंद्र चाटे, स.फौ. रावसाहेब‎ शिंदे, स.फौ. मारुती कोळपे, पो.हे.कॉ.‎ अजिनाथ खेडकर, पो.हे. कॉ. ज्ञानेश्वर‎ पठारे, चा.पो.हे.कॉ. भाऊ शिंदे, पो.ना.शरद‎ कदम, पो.ना.शरद गागंर्डे, पो.ना. नंदू पठारे,‎ पो.ना. संतोष धांडे, पो.कॉ. विनोद पवार,‎ पो. कॉ. कैलास शिपनकर, पो.कॉ. संदीप‎ दिवटे, पो.कॉ. सतीश शिंदे, पो.कॉ. सचिन‎ पठारे यांनी ही कारवाई केली.‎

घरातील, शेतातील‎ कामांसाठी होतो वापर‎

श्रीगोंदे तालुक्यात काही गुन्हेगारी‎ प्रवृत्तीच्या टोळ्या मानवी तस्करी‎ करीत असून, या लोकांना डांबून ठेवून‎ मारहाण करतात. वेठबिगार म्हणून‎ त्यांच्याकडून घरचे, शेतातील कामे‎ करून घेतात. विविध रेल्वे स्टेशनवर‎ त्यांच्याकडून भीक मागवतात. या‎ वेठबिगारांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना‎ पाण्यात किंवा बेवारसपणे टाकून‎ देतात. काही वीटभट्ट्या, तसेच‎ शेतातील बागेत असे अनेक जण‎ कामावर असल्याचे समजते.‎

घरातील, शेतातील‎ कामांसाठी होतो वापर‎ श्रीगोंदे तालुक्यात काही गुन्हेगारी‎ प्रवृत्तीच्या टोळ्या मानवी तस्करी‎ करीत असून, या लोकांना डांबून ठेवून‎ मारहाण करतात. वेठबिगार म्हणून‎ त्यांच्याकडून घरचे, शेतातील कामे‎ करून घेतात. विविध रेल्वे स्टेशनवर‎ त्यांच्याकडून भीक मागवतात. या‎ वेठबिगारांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना‎ पाण्यात किंवा बेवारसपणे टाकून‎ देतात. काही वीटभट्ट्या, तसेच‎ शेतातील बागेत असे अनेक जण‎ कामावर असल्याचे समजते.‎