आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये डीजे लावण्यास बंदी करण्यात आली आहे. केवळ दोन स्पीकर बॉक्सलाच परवानगी देण्यात येईल, असे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मिरवणूक शांततेत पार पाडावी, कोणतेही गैरकृत्य, सामाजिक भावना दुखावल्या जातील, असे कृत्य करू नये, अशा सूचना संघटनांना देण्यात आल्या आहेत.
पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांच्या उपस्थितीत शहरातील संघटना व प्रतिनिधींची बैठक तोफखाना पोलिस ठाण्यात घेण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, संपतराव शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख आदी उपस्थित होते.
मिरवणुकी दरम्यान डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी संघटनांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आली होती. मात्र पोलिस प्रशासनाकडून डीजे लावण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. परवानगी घेणाऱ्या संघटना, मंडळांना केवळ दोन स्पीकर बॉक्स लावण्यास परवानगी दिली जाणार आहे, असे उपअधीक्षक कातकडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
मिरवणुकी दरम्यान गैरप्रकार होणार नाहीत, सामाजिक भावनात दुखावल्या जातील, अशी कृती होणार नाही, झेंडा अथवा स्पीकरवर वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांमधून इतर समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाकडून देण्यात आल्या. दरम्यान, मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवरही पोलिसांकडून बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मोहरम उत्सवामध्येही डीजेला परवानगी नाकारण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.