आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापा:बोल्हेगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगर येथे घरात सुरू असलेल्या तिरट जुगारावर तोफखाना पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी जुगार खेळणार्‍या चौघांना पकडले. शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार सचिन जगताप यांनी फिर्याद दिली आहे.

शुभम संतोष माळवे (वय २१, रा. खुलताबाद, जि. औरंगाबाद, हल्ली रा. चोबे कॉलनी, बोल्हेगाव), सखाराम गोरक्षनाथ मोरे (वय ३८, रा. सुरेगाव ता. श्रीगोंदा, हल्ली रा. चोबे कॉलनी, बोल्हेगाव), सुधीर रमेश गायकवाड (वय ४९, रा. हिंगोणी कांगोणी ता. नेवासा, हल्ली रा. गणेश चौक, बोल्हेगाव), ज्ञानदेव गुलाब कांबळे (वय ४८, रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम, दुचाकी, तिरट जुगाराचे साहित्य असा १ लाख १८ हजार २४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळुंके, अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, संदीप धामणे, जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...