आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील गुहा गावात चालणाऱ्या कुंटणखान्यावर राहुरी पोलिसांनी छापा टाकून ३ महिलांची सुटका करत स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कुंटनखाना चालविणा-या महिलेस ताब्यात घेतले आहे.
सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलिस पथकाला बरोबर घेऊन ही कारवाई केली. नगर मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या गुहा गावातील बडोदा बँकेजवळ एका बंगल्यात गेल्या अनेक महिन्यांपासून हा कुंटणखाना सुरू होता.माञ पोलीस प्रशासनला या वेश्याव्यवसायाची साधी भणक लागलेली नव्हती. सोमवारी रात्री निनावी खबरेवरून या कुंटणखान्यावर छापा टाकण्यात आला.
पोलिसांनी बनावट ग्राहक बनून या व्यवसायाचा पर्दाफाश केला. पोलिस आल्याचा सुगावा लागताच ग्राहकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो व्यर्थ ठरला. यावेळी पीडित महिला तसेच ग्राहकांना पोलिस पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. या छाप्यात दीड हजार रूपयांची रोकड, ५ मोबाइल संच पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी गुहा येथील महिलेवर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कुंटणखाना चालवण्यास घराचे रूम उपलब्ध करून देणे तसेच अनैतिक व्यापारास प्रतिबंध या कलमानुसार राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे करीत आहेत. नगर मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या राहुरी फॅक्टरी ते कोल्हार खुर्द या परिसरातील काही हॉटेल व धाब्यावर यापूर्वी खुलेआम वेश्या व्यवसाय चालत असल्याचे पोलिसांच्या छाप्यातून उघड झालेले आहे. हॉटेल व ढाब्या पाठोपाठ चक्क गुहा गावातील बाजारपेठेत कुंटणखाना सुरू असल्याचे उघड झाल्याने या वेश्या व्यवसायाला पाठबळ कुणाचे ? हा सवाल चर्चेचा बनला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.