आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध स्पर्धा परीक्षांची तयारी:बेलापूर महाविद्यालयात पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र; चेअरमन राजेश खटोड यांची माहिती

श्रीरामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बेलापूर महाविद्यालयात पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण सुरू आहे. त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आणि बेलापूर महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड यांनी केले. यावेळी प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे उपस्थित होत्या. महाराष्ट्र शासनाकडून १७ हजार जागांसाठी पोलिस भरती होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त भरतीपूर्व प्रशिक्षण पूर्ण करून या परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहनही त्यांनी केले. या पोलिस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी नाममात्र फी भरून विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा. महाविद्यालयात विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जात आहे.

प्रथम वर्ष कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बेसिक, तर कोर्स सुरू आहे. विद्यार्थिनींसाठी कराटे प्रशिक्षण घेतले जात आहे. लवकरच बेलापूर महाविद्यालयात संगीत विभाग सुरू करण्यात येणार असून संगितशास्रात आवड असलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रा. डॉ. मनोज तेलोरे काम करणार आहेत. स्पर्धा परीक्षा विभाग, समान संधी केंद्र, करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल विभागाच्या वतीने आयोजित या पोलिस भरती पूर्व प्रशिक्षणाचे ट्रेशनर कोच म्हणून प्रा. सुनील गाडेकर हे काम करणार आहेत, तर समन्वयक म्हणून डॉ. विनायक काळे कामकाज पाहत आहेत. या प्रशिक्षण संयोजनासाठी प्रा. विकास नालकर, प्रा. डॉ. विठ्ठल सदाफुले, डॉ. अशोक माने, डॉ. बाबासाहेब पवार परिश्रम घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...